२०२४ साठी नवा संकल्प केलेले मोदी सरकार काशी विश्वनाथ, महाकाल मंदीर, नवीन संसद भवन आणि वॉर मेमोरियलचे निर्माण तसेच ३७० कलम रद्द करून काश्मीरला एक नवीन पर्यटन शहर बनवले आहे. अजून बरेच काही करणे बाकी आहे. याचे एकमेव कारण हे आहे की जनतेच्या मनावर हे बिंबवल्या गेले आहे की 'मोदी आहे तर शक्य आहे.' हेच कारण आहे की देशाची धुरा राष्ट्रवादी विचाराला पुढे घेऊन जाणाऱ्या पीएम नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. नोटबंदी, जीएसटी, तीन तलाक, न्यू इंडिया, जल संरक्षण, लोकसंख्या आणि आता राम मंदीरासारख्या निर्णयामुळे मोदी सरकारवर भारतीय जनतेने विश्वास दाखविला आहे. नवीन योजनेत लोकसंख्या नियंत्रण मोदी सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे, जी भारताला एक नवीन दिशा देईल. अगदी अशीच जल सरंक्षणासारखी महायोजना जी प्रत्येक घरापर्यत नळाद्वारे पाणि पोहचवण्याचे उद्देश ठेवून निर्माण करण्यात आली आहे. देशातील लोक ज्यावेळी स्वयंशिस्त, कर्मठता, ईमानदारी, दृढविश्वास, उत्साह, जोश सारख्या शब्दांचा अर्थ गमावून बसले होते, त्यावेळी मोदींने त्यांना आपले शस्त्र बनवले. जगासमोर एक उदाहरण ठेवले. हे त्यावेळी शक्य झाले, ज्यावेळी मोदीजींने स्वतःसाठी ढांचा आणि निकष ठरवले आणि त्याचे तंतोतंत पालन करीत राहिले. त्यांच्या समोर कोणतेही आव्हान नाही आहे. आव्हान तर ते स्वतःच निर्माण करतात आणि ध्येय ते स्वतःच ठरवतात. असे पण म्हणतात की मोदीने स्वतःला गाडून घेतले आहे, म्हणून तर आज प्रत्येकांच्या ओठांवर आहे, 'मोदी आहे तर शक्य आहे.'