आनंद, आश्चर्य व कौतुकाने नवीन पाहुण्याचे स्वागत कसे करावेगर्भसंस्कार असा संस्कार आहे, जो आपण आपल्या पूर्वजांकडून प्राचीन सांस्कृतिक उत्तराधिकाराच्या रूपात प्राप्त केला होता. परंतु हळूहळू समजेअभावी त्याचे महत्त्व कमी होत गेले. आज जेव्हा वैज्ञानिकांनीही कबूल केले, की बाळाचा मानसिक व व्यावहारिक विकास गर्भातच सुरू होतो व त्याला योग्य ते गर्भसंस्कार देऊन त्याचा चांगला विकास घडवून आणू शकतो, तेव्हा पुन्हा गर्भसंस्कारांचे महत्त्व व त्याची उपयुक्तता आधुनिक पिढीने स्वीकारली.
त्यासाठी गरज आहे, अशा एका गर्भसंस्कार समजेची, जी आजच्या घडीला उपयुक्त ठरेल, आजच्या भाषेत सांगेल, आजची उदाहरणे, आव्हाने समोर ठेवून आई-वडिलांना योग्य मार्ग दाखवेल. प्रस्तुत पुस्तक हा उद्देश समोर ठेवून लिहिले गेले आहे. यामध्ये गर्भसंस्काराची प्राचीन मूळ समज आधुनिक स्वरूपात प्रस्तुत केली आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवते-
- स्वतःबरोबर आपल्या गर्भस्थ शिशूचा भावनिक, मानसिक तसेच शारीरिक विकास कसा करावा, त्याला संतसंतान कसे बनवावे?
- गर्भावस्थेत आपला आहार, विचार व आचार कसा असावा?
- गर्भस्थ शिशूमध्ये चांगल्या गुणांचा विकास कसा करावा, त्याला वाईट सवयी व दुर्गुणांपासून दूर कसे ठेवावे?
- गर्भस्थ शिशूचा सर्वोत्तम विकास होण्यासाठी कसे वातावरण द्यावे?
By:
A Happy Thoughts Initiative Imprint: Wow Publishings Dimensions:
Height: 216mm,
Width: 140mm,
Spine: 12mm
Weight: 263g ISBN:9789390607037 ISBN 10: 9390607035 Pages: 202 Publication Date:01 September 2024 Audience:
General/trade
,
ELT Advanced
Format:Paperback Publisher's Status: Active